Amazon

Ads Area

header ads
header ads

रामायण रचयिता महर्षी वाल्मिकी यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला माहित आहे का? Maharshi Valmiki information in Marathi

काव्य, कथासंग्रह, कविता हे प्राचीन काळापासून जपून ठेवलेले साहित्यिक ग्रंथ आपल्यांना संस्कार ,परंपरा, गतयुगात झालेल्या गोष्टी तसेच त्यातून झालेल्या चुका सांगतात. आणि याचाच अभ्यास करून आपण आपल्या वर्त युगात त्या चुका न करता अधिक सुलभ जीवन जगावे हा साहित्यिक ग्रंथांचा मूळ उद्देश असतो.

रामायण ,महाभारत या सारख्या महाकाव्याततून आज संपूर्ण जगाला शिकवण मिळत आहे. हजारो वर्षे लोटली तरी या काव्यांचा ,यातील प्रसंगांचा, तत्त्वांचा प्रभाव अद्यापही विसरू शकत नाही ,असा ग्रंथ रचला असून लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे.

Maharishi Valmiki Biography in Marathi

रामायण हे सुद्धा एक जगप्रसिद्ध महाकाव्य ठरले आहे. त्रेतायुगात महर्षी वाल्मिकी यांनी हे रामायण लिहले. यावरूनच गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस रचल्याचे सांगितले जाते.

महर्षी वाल्मिकी यांचा जन्मदिवस कधी असतो?

what is the date of birth of valmiki?

महर्षी वाल्मिकी यांचा जन्म अश्विन पौर्णिमेला झाले असून  वाल्मीकि जयंती यावर्षी 20 ऑक्टोंबर रोजी वाल्मिकी जयंती साजरी होणार आहे. आदिकवी वाल्मिकी यांचा जन्मदिवस देशभरात वाल्मिकी जयंती(Valmiki Jayanti) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रामायण पठण करून वाल्मिकी ना आदराचे वंदन केले जाते.(Valmiki birth place)


वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ?History of Maharishi Valmiki in Marathi

रामायणाचा रचयिता म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक लहानपणी लुटमारीच्या धंदा करत असे. म्हणजेच वाल्मिकींचे आई आणि त्यांचे वडील त्यांना किराता जवळ ठेवून तपश्चर्येला जात असे तेव्हा वाल्मिकी गुपचूप चोरी करत असे.म्हणूनच सर्व लोक त्यांना वाल्या कोळी असे म्हणू लागले. वाल्मीकि एकदा काही ऋषींना घेरले होते. परंतु ते ऋषी हुशार होते त्यांनी त्याला उपदेश केला. त्याच्या जीवावर जगणारे त्याचे कुटुंबीय त्याच्या पापात वाटेकरी होतात काय असे विचारून येण्यास सांगितले.कोणीही जेव्हा काहीच बोलले नाही तेव्हा त्यास पश्चाताप झाला. वाल्मिकी जिथे बसले होते तिथेच राम मंत्राचा जप सुरू केला. जप करता करता त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे   वारूळ तयार झाले. म्हणूनच त्यांना वाल्मिकी असे नाव मिळाले.

महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त शेअर करा मेसेज, व्हाट्सऍप स्टेटस, फोटोज, माहिती, संदेश, ग्रेटिंग, कोट्स, साठी येथे क्लिक करा.

वाल्मीकींविषयी विशेष माहिती :

वाल्मिकी हे मोठे शिवभक्त होते.. महर्षी वाल्मिकींना तपस्वी मुनिपुंगव , द्विज अशी अनेक विशेषणे रामायणामध्ये वापरली आहेत. रामायणाच्या उत्तरकांडात वाल्मिकींनी आपली उत्पत्ती सांगितली आहे असे म्हटले जाते,‘प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनंदन’ म्हणजेच आपण प्रचेतसाचा दहा पुत्र आहोत असे त्यांनी म्हटले जाते   असे नोंदविण्यात आले आहे. प्रचेता म्हणजे वरून. भृगू आणि  वाल्मिक असे दोन पुत्र होते. असा उल्लेख भागवतात आला आहे .


महाभारत वाल्मिकींचा उल्लेख :

रामायणात तमासा तीरावर वाल्मिकीं च्या आश्रमाचे वर्णन केले जाते . वाल्मिकींचे अनेक शिष्य होते .यामध्ये भरद्वाज हा प्रमुख शिष्य होता. रामाने सीतेचा त्याग केल्यावर तिचा व  तिच्या  पुत्रांचा वाल्मिकी ऋषींनी सांभाळ केला. कुश लव यांना शिक्षण देऊन रामायण शिकवले रामाच्या अश्वमेध यज्ञात  शिष्य समवेत उपस्थित होते असा उल्लेख महाभारतात केला आहे.

एकदा एका ऋषीबरोबर वादविवाद झाल्याने वाल्मिकींना ब्रह्महत्येचा दोष लागला व महादेवाच्या उपासनेने ते पापमुक्त झाले, असाही निर्देश महाभारतात आल्याचे आढळून येत

महर्षि वाल्मीकि यांचा जीवन परिचय, जयंती, निबंध कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. अश्याच माहितीसाठी जीवन मराठी ला फॉलो करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads