Amazon

Ads Area

header ads
header ads

Maharashtra School Reopen : पहिली ते चौथी शाळा सुरु होण्याची शक्यता? टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यावर निर्णयाची शक्यता

Maharashtra School Reopen : आपल्या शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न आता सर्वांना पडत आहे. राज्यातील हॉटेल, व्यवसाय, मंदिरे चालू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता शाळा आणि महाविद्यालय यानंतर प्राथमिक शाळा कधी सुरू होईल? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. तर आता लवकरच या प्राथमिक शाळा सुरू होणार असल्याचे संकेत महाराष्ट्र राज्य सरकारने दिले आहेत. इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यात असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मकरीत्या विचार करत असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर त्यांचा जोर आहे. कोविड टास्क फोर्ससोबत, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ चर्चा करून लवकरच पहिली ते चौथी शाळा सुरू करणार असल्याच्या निर्णयाची शक्यता आहे 
 
काल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्ह्यामधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठकीत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करत असताना शाळांचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली. कोविड आव्हानात्मक काळामध्ये आपल्या शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.



महाराष्ट्रात 4 ऑक्टोबरपासून 5 ते 12 वी शाळा आणि महाविद्यालयं सुरू 
चार ऑक्टोंबर रोजी सुमारे दीड वर्षानंतर शाळा पुन्हा सुरू झाले आहेत. राज्यामध्ये या निमित्ताने शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला होता. सध्या पाचवी ते बारावी पर्यंत शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली आहेत तर मीच आक्टोंबर पासुन वरिष्ठ महाविद्यालय देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या