Amazon

Ads Area

header ads
header ads

संत नामदेव यांच्याबद्दल माहिती मराठीमध्ये | Information in Marathi

महाराष्ट्राच्या संताबद्दल माहिती घेत असताना श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा व बऱ्याच संतांची माहिती मिळते. संत परंपरा विविध स्तरातून आली होती. आणि पुढेही ती चालू राहिली. संत गोरोबा, संत सावता माळी, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महंमद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांनी संतपरंपरा पुढे चालविली. 

संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव या गुणांची शिकवण देत समाजात कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही सर्वजण समान आहेत अशी समतेची भावना समाजात निर्माण केली.
चला तर जाणून घेऊ संत नामदेव यांच्या विषयी,

संत नामदेव फोटो
संत नामदेव कोण होते?
संत शिरोमणी नामदेव महाराज हे पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. नरसी या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील गावात त्यांचा जन्म झाला. ते वारकरी संतकवी होते, तर मराठी भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील कवी म्हणून सुद्धा त्यांचं नाव आहे. संत नामदेवांनी वज्र भाषेमध्ये सुद्धा काव्ये केली आहेत.

संत नामदेव यांचा जन्म कधी झाला?
संत नामदेव यांचा जन्म कोठे झाला?

संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी नरसी जिल्हा हिंगोली येथे झाला. प्रभव नाम संवत्सरात, शके 1192 मध्ये एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. 

संत नामदेव यांची माहिती आणि कार्य(Information and work of Saint Namdev)
भागवत धर्माच्या प्रसारासाठी संत नामदेवांनी संपुर्ण महाराष्ट्रभर संचार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत त्यांनी पोचवला. किर्तनाद्वारे लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा आणि भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार समाजात निर्माण केला. भारतभर प्रवास करून त्यांनी मानवधर्माचा संदेश पोचवला. पंजाबात गेल्यानंतर तेथील लोकांना समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. 'गुरुग्रंथसाहिब' या धर्मग्रंथात त्यांची काही पदे समाविष्ट आहेत. संत नामदेवांनी लिहिलेले अभंग महाराष्ट्रात मोठ्या भक्तीने गायले जातात. 

संत नामदेवांचे वडील दामाशेट्टी कपडे शिवण्याचा म्हणजे शिंपीचा व्यवसाय करीत. त्यांच्या आईचे नाव गोणाई होते. 
संत नामदेवांच्या मोठ्या बहिनेचे नाव आऊबाई, तर पत्नीचे नाव राजाई होते. 
त्यांना 4 पुत्र आणि 1 मुलगी होती. नारा, विठा, गोंदा, महादा असे 4 पुत्रांची नावे होती. तर मुलीचे नाव लिंबाई होते.

संत नामदेवांनी किती अभंग लिहिले?

संत नामदेवांनी रचलेली अभंगगाथा प्रसिद्ध असून यात सुमारे 2500 अभंग असून त्यातील काही अभंगरचना शौरसेनी भाषेत आहेत. 
यातील 62 अभंग शीख धर्माच्या 'गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथात घेण्यात आली असून त्याला 'नामदेवजी की मुखबानी' म्हणतात. 

संत नामदेवांचे आयुष्याचे ध्येय' नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' असे होते. संत ज्ञानेश्वरांचे चरित्र आदि, समाधी, तीर्थावळी या गाथातील तीन अध्यायातून सांगितले आहे.

संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशीला, शके 1272 म्हणजेच शनिवारी दि. 3 जुलै 1350 ला पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. त्यांचा संत शिरोमणी अस यथार्थ संबोधन वापरून उल्लेख केला जातो

संत नामदेवांच्या गुरुचे नाव काय आहे?
- संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले होते.

महाराष्ट्राचे संत कोण आहेत ज्यांच्या अभंग भाषणाचा उल्लेख श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहे?
- संत शिरोमणी नामदेव

संत नामदेव महाराज पूर्ण नाव काय आहे?
- नामदेव दामाशेट्टी रेळेकर

नामदेवाचा जन्म कोणत्या गावी झाला?
नरसी जिल्हा हिंगोली

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या