Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali 2021: धनत्रयोदशी पूजा , महत्व जाणून घ्या| Dhantrayodashi information in Marathi

जीवन मराठी: भारतीय संस्कृती प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे. वेगवेगळे लोक एकत्र येऊन त्यांच्यामधील गोडी वाढावी हा सण साजरे करण्यामागचा मुख्य हेतू असतो. गतकाळात झालेल्या काही घटनांवर अनेक सण साजरे केले जातात. पण काही सण आणि उत्सव हे पूर्वजांपासून आलेल्या पिढीजात परंपरेने केले जातात.


दिपावली हा सणांचा राजा मानल्या गेलेल्या उत्सवात लोक आनंदाने सहभागी होऊन वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. सांस्कृतिक आणि कलात्मक दृष्टिकोण दीपावलीचे महत्त्व स्पष्ट करते. वसुबारस, धनत्रयोदशी ,नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा ,लक्ष्मीपूजन ,दीपावली पाडवा आणि भाऊबीज या दिवसांचे विधी ,पूजा मांडून ते वेगवेगळ्या दिवशी क्रमाने साजरे केले जाते. आपण धनत्रयोदशी म्हणजे काय? आणि याचे  महत्त्व जाणून घेऊया.


धनत्रयोदशी हा दीपावली चा दुसरा दिवस. अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरा केला जातो. देवांचे वैद्य धनवंतरी यांचा या दिवशी जन्म झाला .त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन असेही संबोधतात. संपत्ती ,धन ,पैसा आणि आर्थिक वाढ व्हावी घरात सुख ,शांती यावी. म्हणून या दिवशी लक्ष्मीदेवी आणि कुबेर यांचे मनापासून पूजन केले जाते. दररोज वापरण्यात येणाऱ्या वस्तू , वाहने यांचे उपोषण करण्यात येते.

 इंद्र देव आणि असुर यांच्यामध्ये जेव्हा समुद्रमंथन चालले होते, तेव्हा या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली तसेच धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाल्यामुळे त्या दोघांचीही पूषा धनत्रयोदशीला केली जाते.अमृतकुंभ हा देवांचा वैद्य होता. उत्तम औषधींचा लाभ त्याच्यामुळे देवांना मिळत असे.

व्यापारी लोक या दिवशी स्वतहाच्या दुकानातील भैय्या वया वह्या साहित्य यांचे पूजा करतात तसेच या दिवसापासून नवीन हिशोबाची वही घालण्याची प्रथा आहे आहे.


कशी करतात धनत्रयोदशी पूजा ?

या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करून नवीन पोशाख परिधान करतात. घराबाहेर रांगोळी काढून पण त्या दिवे लावले जातात. फटाके उडविणे, सूर सूर काड्या लावणे लहान मुलांचे आवडते उद्योगच असते. आकाश कंदील आणि दिवेलागणी केली जाते. घरातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन सर्वांना शुभेच्छा संदेश दिले जातात. घरातील केलेला फराळीचा पदार्थ एकमेकांना वाटले जातात. यामुळे समाजातील एकमेकांमध्ये असलेले राग, द्वेष मावळून पुन्हा एकदा नवीन सुरुवात होते. म्हणूनच दिपावली हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद सुख, समृद्धी, घेऊन येतो.






हे नक्की वाचा :





हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads