Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali 2021 निमित्त Ampere Electric ने आणली नवीन electric bike Ampere Magnus EX ! किंमत अगदी कमी. 10 सेकंदात 40Kmph speed.

 इंधनाचा साठा कमी असल्याने पेट्रोल  डिझेल च्या‌ दरात वाढ होत चालली आहे. भारतीय इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती दाखवत आहेत.  देशातील नामवंत इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक Ampere Electric ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ampere Magnus EX भारतात लाँच केली आहे.

Ampere Magnus EX स्कूटरची किंमत ६८,९९९ रुपये (एक्स-शोरूम, पुणे) अशी जाहीर केली आहे.Ampere Magnus EXइलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर १२१ किमी पर्यंत रेंज देते. असे कंपनीने दावा केला आहे, याशिवाय कंपनीने या स्कूटरमध्ये खूप नवीन नवीन चांगले फीचर्सही दिलेत.


Ampere Magnus EX १० सेकंदात 40kmph स्पीड देते.
Magnus EX स्कूटरमध्ये हलकी आणि पोर्टेबल लिथियम बॅटरीचा वापर करून ही बॅटरी डिटॅचेबल असल्यामुळे घर, ऑफिस, कॉफी शॉप किंवा एखाद्या प्लग-ऑन-वॉल चार्ज पॉईंटवर कोणत्याही 5-amp सॉकेटवरून चार्ज करता येते.

या स्कूटरला १२०० वॅटची मोटर प्रोव्हाइड केले आहे. Magnus EX स्कूटर १० सेकंदात ० ते ४० किमी प्रति तास स्पीड देते.

Magnus EX स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट, ४५० मिमी मोठा लेगरूम स्पेस, की-लेस एंट्री, व्हेइकल फाईंडर, अँटी थेफ्ट अलार्म, सहज काढता येणारी बॅटरी अशा प्रकारचे अनेक फीचर्स देऊन कंपनीने या स्कूटरला लॉन्च केले आहे. कंपनीने या स्कूटर ला ड्रायव्हिंग कंम्फर्टसाठी डिझाइन केलेली एक रुंद सीट मिळते.


 कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर मेटॅलिक रेड, ग्रेफाइट ब्लॅक आणि गॅलेक्टिक ग्रे अशा तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे.


ड्रायव्हिंग मोड्स -
Ampere Magnus EX यामध्ये सुपर सेव्हर इको मोड आणि पेपर पॉवर मोड असे दोन ड्रायव्हिंग मोड्स या स्कूटरमध्ये मिळतात.

 ही स्कूटर ५३ किमी प्रतितास इतका टॉप-स्पीड देते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा असून बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १२१ किमीपर्यंत ARAI प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज मिळते.

 विविध राज्य सरकारांच्या ई-वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत कंपनीची ही ई-स्कूटर लोकांना अधिक आकर्षक किंमतीत उपलब्ध होईल असे कंपनीने म्हटले आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads