Amazon

Ads Area

header ads
header ads

Boby Deval च्या बंडखोर वृत्तीमुळे धर्मेंद्रजी झाले होते अस्वस्थ या एका गोष्टीमुळे सर्व नाती झाली उद्ध्वस्त....

 बॉबी देवल हा प्रसिद्ध अभिनेता म्हणून काही काळामध्ये ओळखला जात होता. त्याच्या पर्सनॅलिटी त्याचप्रमाणे मासूम चेहऱ्याने प्रेक्षकांची मन त्याने आपल्याकडे वळवून घेतले होते.

पण जेव्हा बॉबीला त्याचे वडील त्याच्यापासून दूर गेल्यासारखे वाटत होते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे दुर्लक्षही करून लागला होता.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची खासगी जीवन कहाणी एका सिनेमाच्या कहाणी पेक्षा कमी नाही. लग्न झालेले असतानाही ते अभिनेत्री हेमामालिनी यांच्या प्रेमात पडले नंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी लग्न सुद्धा केले आणि आपला वेगळा संसार सुरू केला.

धर्मेंद्र यांचे त्यांच्या मुलांशी म्हणजे सनी देओल आणि बॉबी देवल यांच्याशी खूप जवळचे नाते असले तरी एक काळ असा होता जेव्हा छोटा मुलगा बॉबी. हा खूप बंडखोर स्वभावामुळे त्यांची रात्रीची झोपच उडाली होती केवळ एका गोष्टीमुळे बॉबी  बंडखोर झाला होता.


बॉबीने एका मुलाखतीत स्वतः एक गुप्त गोष्ट व्यक्त केले होते, ते म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना क्लबमध्ये जाणे आणि पार्टी करणे सुरू केले. या दरम्यान त्याच्यामध्ये बंडखोर वृत्ती वाढू लागली. धर्मेंद्रजी  खूपदा काही समजावून सांगत असत पण त्याकडे दुर्लक्ष करून मला जे काय करायचे आहे ते मी करणार ,असं बॉबीचे मत... कित्येक वर्ष अभिनेत्याला अशाच पद्धतीने आपल्या पालकांचे सल्ले टाळण्याचे काम केले .पालक जे काही सांगत आहेत ते आपल्या भल्यासाठीच आहे याची देखील त्याला जाण होती. पण बॉबीने पुढे असेही सांगितले की या काळात त्याला वडिलांच्या डोळ्यात आपल्यासाठी काळजी दिसत होती.

या कारणामुळे वाढले अंतर...

अभिनेत्याने सांगितलं की कामात व्यस्त असल्याने वडिलांना आमच्यासाठी पुरेसा वेळ काढणे शक्य होत नसेल त्यामुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले असे वयानुसार अधिक वाढत गेल्याने दोघांमध्ये वाढलेल्या दुराव्यात मुळे अनेक गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या.

दरम्यान बॉबी जेव्हा मोठा झाला आणि त्याच्यावर जबाबदाऱ्या येऊ लागल्या येऊ लागल्या . तेव्हा त्याला समजले की सर्व वडिलांनी त्या काळात काम केले नसेल तर लहानपणापासूनच जीवनात चांगल्या सोयीसुविधा कधीच मिळाल्या नसत्या.

याबाबत रिलेशनशिप एक्सपर्ट देखील हेच सांगतात की पालकांनी कामात खूप व्यस्त असणे आणि मुलांना वेळ न देणे यामुळे त्यांच्या चांगले नातेसंबंध निर्माण होऊ शकत नाही परिणामी मुले पालकांची भावनिकरित्या जोडले जात नाहीत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या