Amazon

Ads Area

header ads
header ads

बँक खात्यातून पैसे चोरीला जातात हे उपाय करा. पैसे पुन्हा मिळतील....

 नोटाबंदी ते आत्तापर्यंत च्या काळात पैशांबाबतीतले व्यवहार खूपच बदलले आहे .तुम्ही देखील ऑनलाईन व्यवहार करून उत्तम सोयीस्कर पर्याय निवडला असालच .पण काही ऑनलाईन फसवणुकीमुळे अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे हे तुम्हाला प्रश्न असेलच चला तर सविस्तर जाणून घेऊ.


वैशिष्ट्ये 

◾बँकिंग फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये झाली आहे वाढ.

◾ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज.

◾ऑनलाइन फसवणुकीची तक्रार नोंदवणे आता शक्य.


आजच्या काळात डिजिटलायझेशन च्या पर्यायामुळे ऑनलाइन व्यवहार झपाट्याने वाढत चालला आहे परंतु दुसरीकडे फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची बातमी समजतआहे.

अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत असाल ,तर काळजी करण्याची गरज नाही. काही हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही फोन करून फसवणुकीची तक्रार लगेच नोंदवून मदत मिळवू शकता.

फसवणूक करणारे अनेक पद्धतींच्या मदतीने लोकांच्या खात्यांमधील निकामी होत चाललेलं पैसे फसवणुकीच्या वाटेवर चालले आहे.

हेल्पलाईन क्रमांक.

फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक १५५२६० जारी केला आहे.

फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तीला या क्रमांकाद्वारे मदत दिली जाईल.

या हेल्पलाईन द्वारे ऑनलाइन तक्रार नोंदवून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता.

दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा या राज्यातील लोक हेल्पलाइन नंबर वापरू शकतात.

एसबीआय ते आयसीआयसीआय जोडलेल्या आहेत याव्यतिरिक्त नंबर मोबिक्विक ,Flipkart , Amazon  सारख्या प्लॅटफॉर्म ला जोडला गेला आहे.


💫या वेबसाईट वर तुम्ही तुमचे तक्रार दाखल करू शकता.

हेल्पलाइन क्रमांकावरील कॉल मध्ये अडचण येत असेल तर तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करता येईल.


या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.


ऑनलाईन खरेदी केल्यानंतर तुमच्या कार्डाची माहिती कधीही प्लॅटफॉर्मवर सेव्ह करू नका. यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पेमेंट केल्यानंतर तुमच्या कार्डची नेहमी माहिती डिलीट करत रहा .

ऑनलाइन पेमेंट किंवा व्यवहार करण्यासाठी सार्वजनिक वायफाय आणि सायबर कॅफे वापरू नका असे केल्याने फसवणुकीचा बळी ठरू शकाल . जेव्हा  ऑनलाईन पेमेंट कराल तेव्हा तुमचे स्वतःचे मोबाईल नेटवर्क वापरा.यामुळे बँकेत जमा केलेले तुमचे पैसे सुरक्षित राहू शकते.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या