Amazon

Ads Area

header ads
header ads

मुंबईत 15 ऑगस्ट पासून लोकलसेवा सुरू, लागणार ‘हा’ पास | CM Uddhav Thackeray Live

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सोशल मीडियावर संवाद साधला. या संवादात मुंबईकरांचं लक्ष लागून असलेल्या लोकल सेवेसंदर्भामध्ये मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्रदिनादिवशीपासून लोकल सेवा चालू होणार असून यासाठी नागरिकांना त्यांचे कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागलेले असतील. त्याच बरोबर एक पास काढावा लागणार आहे.



लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल सेवेचा लाभ घेता येणार असून यासाठी अँप वर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक पास मिळणार आहे. तो पास असेल आणि लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झाले असतील तरच लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

पुण्यात 9 ऑगस्ट पासून अनलॉक

पुण्यातील अनलॉकबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. पुण्यामध्ये सर्व दिवस सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार असल्याचं ही सांगितले आहे. तर शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी असेल तर मॉल रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. 

 9 ऑगस्ट हे नियम लागू होणार आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाची मुद्दे :*

▪️ उद्यापासून काही ठिकाणी शिथिलता देण्याचा विचार
▪️ हॉटेल्सबाबत उद्या होणार निर्णय
▪️ ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक त्या जिल्ह्यांत काळजी घेण्याची गरज
▪️ कोरोनाचा संसर्ग थोपवायचा असेल तर नियम हे पाळावेच लागतील
▪️ जोपर्यंत ठराविक टप्प्यापर्यंत लसीकरण होत नाही, तो पर्यंत नियम पाळावे लागणार
▪️ आरक्षणाबाबत 50 टक्क्यांची अट काढून टाकली जात नाही, तोपर्यंत राज्यांना अधिकार देऊन काही उपयोग नाही
▪️ मुंबईत दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून  सुरू होणार
▪️ स्मार्टफोन असलेले प्रवासी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील.
▪️ स्मार्टफोन नसलेल प्रवासी पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून पासेस घेऊ शकतील.
▪️ लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यूआर कोड असतील रेल्वे प्रशासनाला सत्यता पडताळता येईल.
▪️ कुणीही बेकायदेशीर पासेस प्राप्त करून घेऊ नयेत.
▪️ लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा. 


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads