Amazon

Ads Area

header ads
header ads

विवोचा ह्यो जबराट मोबाईल लॉन्च, फोटो काढतो वंटास कारण कॅमेरा हाय? Vivo X70 Series in India

विवो या मोबाईल कंपनीची Vivo X70 सिरीज 2 आठवड्यामागे भारतामधी अधिकृतरीतीने लाँच करण्यात आलती. यामधी X70 Pro अन X70 Pro + हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलते. Vivo X70 सिरीजसाठी कंपनीन Zeiss संग भागीदारी केलीय. म्हंजी काय? तर विवोची एक्स७० सिरीज मध्ये मोबाईल येतील त्या फोनच्या सगळ्या कॅमेरा लेन्स नव्या Zeiss T लेन्स कोटिंगसंग येत्याल अन त्याच्या मदतीन तुम्ही नॅचरल फोटू काढू शकताय. तर आता Vivo X70 सिरीजची विक्री पण चालू  झालीय.(Vivo X70 Series News Marathi)
विवोच्या या नव्या मोबाईलची किंमत कितीय? (Vivo X70 Pro & Vivo X70 Pro+ price in india

Vivo X70 Pro ची स्टार्टइंग किंमत ₹46,990 पास्नं सुरू होतीय, यात तुम्हांसनी 8 GB RAM अन 128 GB इनबिल्ट स्टोरेज मिळणार हाय. तर दुसरं वेरीएन्ट असून त्याची किंमत ₹49,990 असणार हाय तर यात तुम्हांसनी 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मिळलं. यासंग अनियेक ऑपशन हाय तो म्हणजे 12 GB RAM आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज. या X70 ची price ₹52,990 असल्याची माहिती आम्हांसनी ऑनलाईन माध्यमांतन मिळाल्या. दरम्यान, X70 प्रो मोबाईलची विक्री मागल्या  आठवड्यापास्नं चालूय. Vivo X70 Pro+ बद्दल सांगायचं तर याची स्टार्टइंग किंमत ₹79,900 हाय. ज्यामधी 12 GB रॅम अन 256 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय मिळतंय. विवोचा ह्यो नवीन X70 मोबाईल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकड खरेदीसाठी उपलब्ध झाला हाय.

विवोच्या नवीन मोबाईलमध्ये फीचर्स काय हाईत? (VIVO X70 pro Specifications)

Vivo X70 pro ह्यो मोबाईल 6.5-इंच फुल एचडी+ डिस्प्लेसंग येतंय. या स्मार्टफोनची स्क्रीन AMOLED स्क्रीन हाय म्हण.तर रिफ्रेश रेट 120Hz हाय. फोनला नवीन फ्लोराईट एजी कोटिंग दिलंय यामुळं तुम्हांसनी स्मूथ अनुभव मिळणार हाय. विवो कंपनीनं या स्मार्टफोनमधी फिंगरप्रिंट दिल नाहीय. तर या स्मार्टफोनला 3D कर्व्ड डिस्प्ले मिळणार हाय.

आता X70Pro मोबाईल दोन रंगामधी उपलब्ध हाय ज्यामधी तुम्हांसनी ऑरोरा डॉन अन कॉस्मिक ब्लॅक कलर मिळणार हाय. ह्या मोबाईलमधी MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर दिलंय. विवो क्स७०प्रो मोबाईल च्या कॅमेराबद्दल सांग म्हणल्यास ह्या मोबाईलचा कॅमेरा 50 मेगापिक्सेल सेन्सरसोबत येतूय. तर आणखी दोन कॅमरे 12 मेगापिक्सेलची हाईत अन एक 8 मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स हाय म्हंजी ह्यो फोन कॉडकॅमेरा सेटअपसहित येतूय. तर ह्यो समार्टफोन कॅमेरा गिंबल स्टॅबिलायझेशन संग येतूय, आणि हे फिचर तुम्हांसनी प्रायमरी कॅमेऱ्यात म्हंजी 50 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यात मिळतं. यामधल्या सगळ्या  कॅमेऱ्यांमधी Zeiss T कोटिंग देण्यात आलेलं हाय.

Vivo x70 pro फोनमधी आणि काय फिचर हाईत अस विचारला तर यामधी तुम्हांसनी डेडिकेटेड पोर्ट्रेट मोड, प्रो सिनेमॅटिक मोड अन नवं रिअल टाइम एक्सट्रीम नाईट व्हिजन मोड मिळतंय. या डिव्हाइसला 4450mAh बॅटरी दिल्या जी 44W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. तर इंस्टावर बुमरंग टाकायला, स्वतःची केस विचरून घेण्यास अन कस दिसतंय बघण्यास किंवा आपल्याला (आयटम) प्रिय असलेल्या व्यक्तीसोबत बोलण्यास, कॉलेजची लेक्चर करण्यास यामधी 32 मेगापिक्सलचा फ्रंटला कॅमेरा दिलय.

Vivo X70 Pro+ मोबाईलमधी काय हाईत फीचर्स?

Vivo X70 Pro + मोबाईलमधी तुम्हांसनी 6.78-इंच UHD स्क्रीन भेटलं जी AMOLED डिस्प्लेसंग येते. या स्क्रीनचा अस्पेक्ट रेशियो 20: 9 हाय अन ह्यो स्क्रीन 120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. विवो एक्स70प्रोप्लस मधी आपल्याला स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर मिळतो. Vivo कंपनीनं x70प्रो डिव्हाईस आपल्या देशात फकस्त एकाच व्हेरिएंटमधी लॉन्च केलंय ते म्हंजी 12 GB RAM आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेजवाला.

तर विवोन X70pro+ च्या कॅमेऱ्यामधी मोठा बदल केलाय. यात तुम्हांसनी 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतोय तर स्पेशल म्हंजी ह्यो कॅमेरा सॅमसंग जीएन 1 सेन्सर वापरुन बनवण्यात आलाय. क्स७०प्रोप्लस मधी 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आलाय. यातला तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट कॅमेरा हाये तर चौथा कॅमेरा 8 मेगापिक्सेल पेरिस्कोप कॅमेरा हाय. यामधल पेरिस्कोप कॅमेरा ह्यो 5x ऑप्टिकल झूम, 60x सुपरझूम अन OIS ला सपोर्ट करतय. यामधी 50 मेगापिक्सेल गिम्बल स्टेबलायझेशन तंत्रज्ञान सुध्दा आपल्याला देण्यात आलाय. Vivo X70 Pro+ मोबाईल कंपनीच्या V1 इमेजिंग टिपसंग येतोय.

तर या डिव्हाइसमधी आपणास 4500mAh बॅटरी मिळते जी 55W फास्ट चार्जला सपोर्ट करते. महत्वाच म्हंजी 50W वायरलेस फ्लॅश चार्जरचा सपोर्टपण या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलाय. पण वायरलेस फास्ट चार्जर आपल्याला येगळा घ्यावा लागतो ज्याचं किंमत ₹4990 हाय.

मग कशी वाटतीय आपली भाषा? आवडली काय? असच लिव्हल तर चालतय नव्ह? सांगा आम्हांसनी कमेंट करून 
अन दुसरं म्हणजे आपल्या सोशल मीडियावर पण शेअर करा. 
अन तिसरं म्हणजे आम्हांसनी फॉलो करायला विसरू नका. आम्ही असेच अपडेट्स घेउन येतो.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads