Amazon

Ads Area

header ads
header ads

युवराज सिंगला झाली होती अटक, नंतर जामिनावर सुटका? वाचा काय आहे प्रकरण?

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक करण्यात आली होती. पंजाब केसरीने दिलेल्या बातमीनुसार, युवराजला हरियाणामधल्या हांसी येथल्या हिसार पोलिसांनी अटक केली.(Yuvraj Singh Arrested) युवराजवर अनुसूचित जातीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. मागील वर्षी रोहित शर्मासंगे एका लाइव्ह चॅटवेळी यजुर्वेंद्र चहलवर जातीवाचक अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप Yuvraj Singh वर करण्यात आला. तर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तो चंदीगडला आला होता. त्याठिकाणी हिसार पोलिसांनी युवराजला अटक केली होती. यावेळी त्याची पोलिसांनी चौकशी केली आहे.
युवराजविरोधात दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी हांसी पोलीस ठाण्यामध्ये SC-ST कायदा आणि IPC च्या कलमाअंतर्गत आरोप केला. त्यानंतर या प्रकरणाबद्दल उच्च न्यायालयात रजत कलसन यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

युवराजने याबद्दल सोशल मीडियावर मागितली माफी

युवराजने सोशल मीडियावर या प्रकरणी 5 जून 2020 ला माफी मागितली होती. त्या पोस्टमध्ये तो लिहितो, "मला हे स्पष्ट करायचे आहे, की कधीही जाती, रंग, वर्ण व लिंगाबद्दल कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास ठेवला नाही. समाजाच्या भल्यासाठी माझे आयुष्य दिले असून ते आजसुद्धा चालू आहे. त्यावेळी मी माझ्या मित्राशी बोलत होतो, माझा मुद्दा चूकीचा समजला गेला, जो निराधार आहे, तरी सुद्धा एक जबाबदार भारतीय असल्याने मी हे सांगू इच्छितो, की जर अजाणतेपणे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मला त्याबद्दल खेद वाटतो.

युवराजची जामिनावर सुटका

हानसी पोलिसांनी अटक केल्यावर युवराजची(Yuvraj Singh News)  चौकशी केली त्यानंतर अटकपूर्व जामीनाच्या कागदपत्राच्या आधारावर त्याची सुटका करण्यात आली. 

तर भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने म्हणजे युवराज सिंगने 304 वन डे मॅच खेळले आहेत. त्याने टी-20 मॅचमध्ये भारताकडून 58 सामन्यात एक महत्वाचा खेळाडू म्हणून कामगिरी केली आहे. तर कसोटी मॅच त्याने  40 सामने खेळले असून 1900 धावा काढल्या आहेत. टीम इंडियाला 2011 च्या वर्ल्डकप जिंकून देण्याऱ्या संघात त्याचा समावेश होता. पहिला T20 वर्ल्डकप जिंकून देण्यात त्याने महत्वपूर्ण भूमिका केली होती. 

Indian Cricket Team मधील गोलंदाजीत त्याने एकदिवसीय सामन्यात 111 विकेट, कसोटीत 9, T20 क्रिकेट मध्ये 28विकेट्स युवराज सिंगने घेतल्या आहेत. 

यानंतर गुगलवर Yuzvendra Chahal Caste हा शब्द जास्त सर्च केला जात आहे. Yuvraj arrested हा देखील शब्द सर्च करण्यात येत आहे. तर काही इंग्रजी वृत्तसेवा casteist slur हा शब्द वापरल्याने युजर्स casteist slur meaning in hindi/marathi असे देखील सर्च करताना आढळून येत आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads