Amazon

Ads Area

header ads
header ads

उभयान्वयी अव्यय (Conjunction) शब्दांच्या जाती- मराठी व्याकरण Information in Marathi

आतापर्यंत आपण मराठी व्याकरण मधील शब्दांच्या जातीचे 7 भाग पाहिलो. त्यात सव्यय प्रकारातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि अव्यय प्रकारातील क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय असे भाग पाहिलो आता आपण उभयान्वयी अव्यय पाहुयात.
उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

दोन शब्द किंवा अधिक शब्द अथवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना 'उभयान्वयी अव्यय' असे म्हणतात.
उदा. आणि, व, पण, परंतु, किंवा, कारण, म्हणून...


शामुकाकांनी शुभमचे कौतुक केले त्याची पाठ थोपटत कौशल्या काकूंना म्हणाले, "वहिनी, तुमचा मुलगा खूप हुशार आहे हो!"

अशोक शाळेत उशिरा येतो , म्हणून तो गुरुजींचा मार खातो.

उभयान्वयी अव्ययांचे 2 प्रकार आहेत.

1. प्रधानत्वसूचक (संयुक्त वाक्य) 

एकमेकांवर अवलंबून नसणारी अथवा अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र अथवा सारख्याच दर्जाची दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात.

समुच्चयबोधक
दोन मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा समुच्चय करतात.

उदा.  आणखी, न, शि, शिवाय, व, अन्, आणि 

विकल्पबोधक
वाक्यांना जोडणारी अथवा, वा, की, किंवा, ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवितात म्हणजेच हे किंवा ते किंवा त्यापैकी एक असा अर्थ सूचित करतात. 
उदा.  किंवा, अगर, अथवा, वा, की

न्यूनत्वबोधक
दोन वाक्यांस जोडणारी पण, परंतु, परी, बाकी, ही अव्यये पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमी, दोष असल्याचा आशय अथवा भाव व्यक्त करतात.

उदा. किंतु, परी परंतु, पण, बाकी.

परिणामबोधक
दोन वाक्यांना जोडणार्‍या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होतो.
उदा. यास्वत, तेव्हा, म्हणून, याकरिता, सबब, तस्मात 

2. गौणत्वसूचक (मिश्र वाक्य)
अर्थाच्या दृष्टीने पहिले वाक्य दुसर्‍या वाक्यावर अवलंबून असते.


स्वरूपबोधक
दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो.
उदा. की, जे, म्हणून, म्हणजे

उद्देशबोधक
सबब, यास्तव, कारण, की, म्हणून यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो.

उदा. कारण,की, म्हणून, सबब, यास्तव

संकेतबोधक
मुख्य गौण वाक्ये जर-तर अथवा जरी-तरी या उभयान्वयी अव्ययामुळे जोडली जातात त्यामधून संकेत व्यक्त होतो.
उदा. जारी-तरी, म्हणजे, की, तर, जर-तर

कारणबोधक
कारण, व, का, की या अव्ययांद्वारे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यातुन व्यक्त केले जाते.

उदाकारण, का, की 

आधीचे मुद्दे- 1. नाम

शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads