Amazon

Ads Area

header ads
header ads

खासगी शाळांमधील फी निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

School Education Minister Deepak Kesarkar will appoint a committee of experts to determine the fees in private schools: विनाअनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शिक्षण शुल्कात वाढ करताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. मात्र, या शाळांमधील शुल्काची नेमकी किती रक्कम राज्य सरकारच्या अखत्यारीत असायला हवी, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य समाधान आवताडे, राजेश टोपे, राहुल कूल, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाघोली येथील 'द लॉक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल’ने फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, द लॉक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमधील सुमारे 200 मुलांना शिक्षण शुल्क न भरल्यामुळे शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले नाही. यानंतर या मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेतली जाईल.

या शाळेबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असताना एकही पालक पोलीस ठाण्यात आलेला नाही. वास्तविक, विनाअनुदानित शाळांचे शुल्क किती असावे, याचा निर्णय राज्य सरकार घेत नसल्याने अनेकदा विनाअनुदानित शाळांमधील शुल्काबाबत अनेक तक्रारी राज्य सरकारकडे येतात. यासंदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती यासंदर्भात काम करेल. तसेच या विषयाबाबत अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने शिक्षणाचा अधिकार(Right to Education) लागू केल्यानंतर विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थानिक गरजू व गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, असा नियम आहे. केंद्र सरकारकडून आरटीई अंतर्गत निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

Fees of unaided schools generally depend on the educational facilities offered to the students. While increasing the tuition fees in schools, the decision is taken after discussion with the parent teacher association of the school concerned. However, School Education Minister Deepak Kesarkar said in the Legislative Assembly that a committee of experts will be appointed to determine the exact amount of fees in these schools should be under the jurisdiction of the state government.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या