Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT 2022/ 2023: शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर 22 तारीख पासून

महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापन असलेल्या शाळांमध्ये पवित्र या संगणकाच्या प्रणालीद्वारे म्हणजेच कॉम्प्युटर प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता येणार आहे. आणि त्यासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 या परीक्षेची आता आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत हे अर्ज मागवण्याची सुविधा 31 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे.
 ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज आपल्याला भरता येणार आहेत हे अर्ज भरण्यासाठी आपल्याला https:// ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेबसाईट द्वारे आपल्याला अर्ज भरता येणार आहेत हे अर्ज भरण्याची शेवट तारीख 8 फेब्रुवारी 2023 आहे. आपण भरलेल्या ऑनलाईन पद्धतीने अर्जांचे परीक्षा शुल्क भरण्याची तारीख 8 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. 

TAIT 2022/ 2023 Admit Card: 
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी(TAIT2022) या परीक्षेचे ऑनलाईन ऍडमिट कार्ड आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी 15 फेब्रुवारी 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

TAIT 2023 Exam Date:
Shikshak Abhiyogyata Ani Buddhimata Chachini Pariksha 2023(टेट एक्साम्) ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होणार असून या परीक्षेचा प्रारंभ दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पासून होणार आहे. ही अभियोग्यता परीक्षा 3 मार्च 2023 पर्यंत चालू राहणार आहे. यामध्ये भौतिक सुविधेनुसार आणि प्रविष्ट असलेल्या उमेदवारांच्या संख्येनुसार ही परीक्षा या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे माध्यम अभ्यासक्रम आणि पात्रता आणि अर्ज करण्याची सर्व कार्यपद्धती तसेच कालावधी याबाबतचे सर्व अधिसूचना या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहेत.

TAIT 2022/ 2023 Timetable: 

टीएआयटी परीक्षा 2023 परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे:-

ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा कालावधी: दिनांक 31/01/2023 ते 08/02/2023

ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक: 08/02/2023 रोजी 23:59 मिनिटे

प्रवेश पत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी: दिनांक 15/02/2023 पासून

ऑनलाइन परीक्षा दिनांक: दिनांक 22/02/2023 ते 03/03/2023
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads