Amazon

Ads Area

header ads
header ads

आलोरे उरूस, ता. चिपळूण | Alore Urus Chiplun 2023

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आलोरे या गावी शहानुर बाबांचा उरुस भरणार आहे.

आलोरे गावातील हा उरूस शहानुर बाबांचा दर्गावर साजरा केला जातो. अलोरे गावात होणारा हा उरूस म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या समाजाचे एकतेचे प्रतीक आहे. हा उरूस ज्यावेळी होतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात भावी शहानुर बाबांच्या दर्शनासाठी एकत्र येतात. 
अलोरे येथे होणारा हा उरूस संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहानुर बाबांचा दर्गा सापडण्यामागे आख्यायिका आहे. अशोकभाई वडगावकर या व्यक्तींच्या स्वप्नामध्ये हा दर्गा नदीकिनारी असल्याचं दिसलं त्यानंतर त्यांनी आलोरे पंचक्रोशीतील नागरिकांना घेऊन येथे खोदकाम केल्यावर त्यांना शहानुर बाबांचा दर्गा सापडला हा दर्गा 40 वर्षांपूर्वी त्यांना सापडला आहे.

हा उरूस गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी होतो. या दिवशी कोणीही मांसाहार करत नाहीत. अजमेर येथून या उरुसासाठी चादर आणि गुलाब येतो. त्यानंतरच या ठिकाणच्या उरुसाला सुरुवात होते. शहानूर बाबांचे भावीक सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच बाहेरील राज्यातून देखील येतात. येथे आल्यानंतर शहानुर बाबांच्याकडे इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी समजूत यामागे आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads