Amazon

Ads Area

header ads
header ads

'अश्या' शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजारांचे प्रोत्साहन रक्कम – मंत्री रवींद्र चव्हाण

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले की, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किमतीव्यतिरिक्त हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जात आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य राजू कारेमोरे, प्रकाश आबिटकर, सुनील भुसारा आणि अनिल देशमुख यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेबाबत प्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेत ही रक्कम दिली जाते. राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता शेतीचा खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम देत आहे. डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 हेक्टर मर्यादेतील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या