Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT 2023 | हवेमधील वायूचे उपयोग | Uses of gases in air

पृथ्वीभोवती वातावरण असून या वातावरणामध्ये हवा आहे आणि या हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, इतर सहा निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साईड, सल्फर डाय-ऑक्साईड, धुलीकन, पाण्याची वाफ या सगळ्यांचा समावेश होत असतो.

हवेमधील वायूंचे उपयोग(Uses of atmospheric gases):

नायट्रोजन

नायट्रोजन(nitrogen) या वायूचा उपयोग सजीवांना आवश्यक असलेले प्रथिने मिळवण्यासाठी केला जातो तसेच अमोनिया याच्या निर्मितीमध्ये देखील नायट्रोजन वायूचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो सोबत खाद्यपदार्थ हवाबंद करण्यासाठी नायट्रोजन या वायूचा उपयोग केला जातो.

हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78% आहे.

ऑक्सिजन:

ऑक्सिजन(Oxigen) या वायूचा उपयोग ज्वलनासाठी आणि सजीवांच्या श्वसनासाठी केला जातो.

हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे.

कार्बन डाय-ऑक्साइड:

कार्बन डाय-ऑक्साइड (Carbon dioxide) या वायूचा उपयोग अग्निशामक नळकांड्यामध्ये केला जातो सोबत वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कार्बन डाय-ऑक्साइड चा वापर करतात.

कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू हवेमध्ये 0.03% आढळतो.

अरगॉन:

अरगॉन(Argon) या वायूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये केला जातो.

अरगॉन हा वायू हवेमध्ये सुमारे 0.9% आढळतो.

हेलियम

हेलियम (Helium) या वायूचा उपयोग कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंखा असलेल्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरला जातो.

निऑन:

निऑन(Neon) या वायूचा उपयोग रस्त्यांवरच्या दिव्यांमध्ये आणि जाहिरातीसाठी असलेल्या दिव्यांमध्ये केला जातो.

क्रिप्टॉन: 

क्रिप्टॉन (Krypton) या वायूचा उपयोग फ्लोरोसेंट पाईप मध्ये केला जातो.

झेनॉन

झेनॉन (Zenon) वायूचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफी मध्ये करण्यात येतो.

इतर वायू आणि घटक यांचे प्रमाण 0.07% आहे.


वर सांगितलेले वायू तपांबर या थरामध्ये एकूण वायूच्या 80% आढळतो तर स्थितांबर या स्तरांमध्ये 19% हे या वायूचे प्रमाण आहे तर दलांबर आणि आयनांबर मध्ये वायूचे प्रमाण कमी होत जातं. 

बाह्यंबर आणि त्या पलीकडे वायू आढळत नाहीत.


हवेत असणारे विविध वायू आणि सोबत असलेले इतर घटक यांचे समतोल असल्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अजूनही टिकून आहे.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads