Amazon

Ads Area

header ads
header ads

किरॉन पोलार्ड आयपीएलमधून निवृत्त, आता मुंबई इंडियन्ससोबत नव्या भूमिकेत दिसणार Kieron Pollard retires from IPL

IPL मध्ये Mumbai Indians चा खेळणारा वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने भारतातील सर्वात मोठ्या लीगमधून म्हणजेच IPL मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.(Kieron Pollard announces RETIREMENT)
मुंबई इंडियन्सने ट्विट करत याची माहिती दिली आहे. किरॉन पोलार्ड पहिल्या सत्रापासून मुंबई इंडियन्स संघासोबत जोडला गेला असून 13 वर्षांच्या IPL करियर नंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान याच वर्षी पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून देखील संन्यास घेतलं होतं.(Kieron Pollard announces retirement from IPL) 

2010 पासून आयपीएल खेळत आहे पोलार्ड

 पोलार्ड 2010 पासून आयपीएल मध्ये जोडला गेलेला आहे. त्याने आयपीएल मध्ये 189 मॅच खेळल्या असून 28.67 सरासरी आहे. तर 3412 रन त्यांनी बनवले आहेत त्याचं स्ट्राइक रेट 147.32 आहे. या धावा बनवत असताना त्याने 16 अर्धशतक केले आहेत.

पोलार्डने बॅटिंगच्या दमावर मुंबईला अनेक मॅच मध्ये जिंकून दिल आहे. तर दुसरीकडे बॉलिंग मध्ये देखील त्याने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पोलार्ड बॉलिंग करत असताना आयपीएल मध्ये आत्तापर्यंत 69 विकेट घेतले आहेत. 44 रनात देत त्यानं 4 विकेट घेतल्या होत्या हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिल आहे. 

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन राहिला आहे पोलार्ड

मुंबई कडून खेळत असताना पोलार्ड पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनला आहे.(2013, 2015, 2017, 2019, 2020). तर दोन वेळा चॅम्पियन्स लीगचा किताब देखील त्याने जिंकला आहे.(2011, 2013) (picking up 5 IPL and 2 Champions League trophies with Mumbai Indians) पोलार्ड बऱ्याच वेळेला रोहित शर्मा जर हजर नसेल तर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून काम केल आहे. येत्या काळामध्ये मुंबई इंडियन्सच्या सोबत नवीन रोलमध्ये पोलार्ड दिसेल. ( Kieron Pollard batting coach in the IPL)पोलार्डला मुंबई इंडियन्स ने बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती दिली आहे. येत्या वर्षामध्ये बॅटिंग कोच म्हणून पोलार्ड टीम सोबत असणार आहे.(appointed as Mumbai Indians batting coach)

फक्त एका फ्रेंचाईजीसोबत खेळत आला आहे पोलार्ड

पोलार्ड हा त्या काही खेळाडूंपैकी एक आहे जे आयपीएलच्या पूर्ण करिअरमध्ये फक्त एका फ्रेंचांची सोबत खेळले आहेत. फक्त एका फ्रेंचाईजीसाठी 100 पेक्षा जास्त आयपीएल मॅच खेळणारा विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीम सोबत 2008 पासून जोडला गेलेला आहे), जसप्रीत बुमराह(मुंबई इंडियन्स सोबत 2013 पासून जोडला गेलेला आहे), सुनील नरेन (कोलकत्ता नाईट रायडर्स या टीम सोबत 2011 पासून जोडला गेला आहे), आणि लसिथ मलिंगा यांचा यामध्ये समावेश होतो.


पोलार्ड ची शेवटची मॅच

पोलार्डने आपली पहिली आयपीएल मॅच 17 मार्च 2010 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरोधात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला होता. तर शेवटची मॅच त्याने नऊ मे 2022 ला कोलकत्ता नाईट रायडर्स विरोधात डी वाय पाटील स्टेडियम मध्ये खेळला आहे. मागील सीजन पोलार्ड साठी खूप खराब राहिला आहे 11 मॅच मध्ये त्याने केवळ 144 रन बनवले आहेत. याच खराब प्रदर्शनामुळे या सीजन ला मुंबई इंडियन्स टीम त्यांना टीम पासून रिलीज करू शकते असं म्हटलं जात आहे. तत्पूर्वी Kieron Pollard ने संन्यास घेतलेला आहे.(Mumbai Indian superstar Kieron Pollard announced his retirement)
223 षटकारांसह बिग हिटर आयपीएलमधील टॉप पाच सिक्स हिटर्समध्ये आहे.

West Indies and Mumbai Indians veteran all-rounder Kieron Pollard announced his retirement from the Indian Premier League (IPL)
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads