Amazon

Ads Area

header ads
header ads

Kantara 4th Week: 'कांतारा' चित्रपटाची चौथ्या वीकेंडला इतकी कोटी कमाई

ऋषभ शेट्टी(Rishabh Shetty) अभिनित आणि दिग्दर्शित कन्नड चित्रपट कांतारा (Kantara Movie collection) याची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. सिनेमा रिलीज होऊन आता चौथा आठवडा झालेला आहे आणि अजूनही चित्रपट बक्कळ गल्ला जमवत आहे. बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांना कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने मागे टाकले आहे.
30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला पौराणिक कथेवर आधारित असलेला KANTARA हा चित्रपट आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटास जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट त्याचे निर्मात्यांनी अनेक भाषांत प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला.

निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कांतारा हा चित्रपट 14 ऑक्टोबरला तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज करण्यात आला होता.

या भाषेमध्ये रिलीज होऊन चित्रपटाला 23 दिवस झाले आहेत मात्र कमाईच्या बाबतीत अजूनही त्याचा वेग कायम आहे.

Kantara Movie Box Office Collection कांतारा'ची कमाई किती ?

ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) याने दिग्दर्शित केलेल्या 'कांतारा' (Kantara) चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) जबरदस्त होत आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन 23 दिवस झाले असले तरी पडद्यावर अजून तुफान गर्दी खेचत आहे. ट्रेंड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, kantara चित्रपटाने चौथ्या शनिवारी 4 कोटी 15 लाखांची कमाई केली आहे. तर 57 कोटी 90 लाखांची कमाई आतापर्यंत कांतारा चित्रपटाने केली आहे.

ऋषभ शेट्टी बद्दल अधिक माहिती Rishabh Shetty information in Marathi

ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) हा या चित्रपटांमध्ये केवळ मुख्य अभिनेता म्हणून काम केला नसून या चित्रपटाची कथा सुद्धा त्यानेच लिहिली आहे. ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty Movies) याने हा चित्रपट दिग्दर्शित सुद्धा केला आहे. 

चित्रपटाची कथा काय सांगते?

 'कांतारा' (Kantara) या चित्रपटाची कथा एका गावाच्या पार्श्वभूमीवर आहे. मानव आणि जंगल यांच्या संघर्षावर हा चित्रपट बनला आहे. कांतारा चित्रपटाची कथा ही कर्नाटकामधील एका गावावर आधारित आहे. आता या चित्रपटाबद्दल अधिक माहिती जर पाहिजे असेल ऐकायचे असेल तर तुम्हाला चित्रपट पाहावाच लागेल. सोबत चित्रपटात ऋषभ शेट्टीसह सप्तमी गौडा (saptami Gowda in kantara movie) मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अच्युत कुमार आणि किशोर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या