Amazon

Ads Area

header ads
header ads

भारताच्या 2022 Doodle 4 Google स्पर्धेचा विजेता श्लोक मुखर्जी! Doodle for Google - India Winner

गुगलने घेतलेल्या गुगल फॉर डूडल या स्पर्धेमध्ये भारतामधल्या 100 पेक्षा जास्त शहरांमधून इंट्री आल्या होत्या. यामध्ये इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत असणाऱ्या मुलांकडून 1 लाख 15 हजार हून अधिक इंट्रीज झाल्या होत्या.

यामध्ये या विद्यार्थ्यांनी मुलांनी "येत्या 25 वर्षांत, माझा भारत होईल..." या थीमला प्रतिसाद देत त्यांनी डूडल बनवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या परवेशिकेमध्ये वापरलेली कल्पकता आणि सर्जनशीलता पाहून गुगलच्या डूडल टीमला आनंद झालेला आहे. (Doodle for Google competition in India) 

गुगलने घेतलेले या स्पर्धेसाठी इंडिया डूडल चे राष्ट्रीय विजयी उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये श्लोक मुखर्जी या उमेदवाराने Google 4 Doodle ही स्पर्धा जिंकलेली आहे. 

श्लोक मुखर्जी दिल्ली पब्लिक स्कूल या न्यू टाऊन कोलकत्ता शाळेमध्ये शिकतो. (shlok Mukherjee From Kolkata) त्याने त्याच्या या कल्पक आणि इन्स्पायरिंग असलेल्या डूडलला "India on the center stage" असे नाव दिले आहे.

श्लोक मुखर्जी लिहितो, "पुढील 25 वर्षामध्ये, माझ्या भारतामध्ये शास्त्रज्ञ मानवतेच्या भल्यासाठी स्वतःचा इको-फ्रेंडली रोबोट विकसित करतील.भारताचा पृथ्वीपासून अंतराळात नियमित अंतराळ प्रवास असेल.भारत योग आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात अधिक विकसित होईल आणि येत्या काही वर्षांत भारत अधिक मजबूत होईल."

श्लोक मुखर्जी याचे हे डूडल 14 नोव्हेंबर 2022 रोजी 24 तास Google.co.in या गुगलच्या वेबसाईटवर फिचर होणार आहे.(Doodle for Google 2022 - India Winner)
(Winner of the India Doodle for Google contest)
या वर्षीच्या Google डूडल जज पॅनेल मध्ये  अभिनेता, चित्रपट निर्माता, निर्माता व टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व नीना गुप्ता यांचा समावेश होता; टिंकल कॉमिक्सचे मुख्य संपादक, Kuriakose Vaisian, YouTube वरील  निर्माते Slayypoint,  कलाकार आणि उद्योजक अलिका भट आणि Google डूडल टीम हे होते.
(Shlok Mukherjee's Doodle will be featured on Google.co.in)

संपूर्ण भारतामधून 20 शेवटच्या स्पर्धकांची निवड करायची होती, कलात्मक गुणवत्ता, सर्जनशीलता, स्पर्धेच्या थीमसह संरेखन आणि दृष्टिकोनातील वेगळेपण आणि नवीनता या निकषांवर प्रवेशांचे मूल्यांकन करण्याचे मोठे कार्य यांच्या कडे होते. (Shlok Mukherjee Google Doodle)

What is Google Doodle?

गुगल डूडल हि गुगलचे लोगो दाखवणारी कंपनी आहे. याद्वारे गुगल या सर्च इंजिन वरील लोगो विशिष्ट दिवशी दर्शवले जातात. उदाहरणार्थ आज 14 नोव्हेंबर बाल दिन आहे तर गुगल डूडल द्वारे गुगलचा लोगो अशा पद्धतीने दर्शवला जातो ज्यातून आपल्याला लहान मुलांविषयी मेसेज मिळेल.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads