Amazon

Ads Area

header ads
header ads

Sangli News: सांगलीच्या आजच्या महत्वाच्या बातम्या | NewsStories in Marathi

या आर्टिकल द्वारे आम्ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या Latest online Marathi News आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. येथे आपल्याला सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव यांच्या News Headlines in Marathi मिळतील.
कृपया शेअर करून आपल्या प्रियजनसोबत सांगलीच्या आजच्या महत्वाच्या बातम्या चर्चा करा.
____________________________________________

Sangli : शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक, अनेकजण प्रलोभनाला बळी

सांगलीजिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात राहणारे गजानन आप्पासो गायकवाड यांनी चेन्नई येथे असलेल्या ग्रोव्हेल ट्रेड कंपनीच्या विरोधामध्ये आटपाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून दिलेल्या तक्रारीनुसार दररोज अडीच टक्क्याने पैसे मिळतील तर 80 दिवसामध्ये दामदुप्पट मिळतील या प्रकारे आमिष दाखवून ऑनलाईन UPI पेमेंट जसे की Google पे आणि RTGS या द्वारे  चेन्नईइथल्या IDFC फर्स्ट या  बँकेमध्ये कंपनीच्या बँक खात्यावर सुमारे 1 कोटी 2 लाख इतकी रक्कम जमा केली असल्याची माहिती मिळत आहे. यात त्यांनी स्वतः  शेतीतून मिळवलेले 20 लाख रुपये  इतर रक्कम मित्र व पाहुण्यांकडून  घेतली असल्याचं सांगितलं तर आता त्याची फसवणूक झाल्यासं समोर आलं आहे. अधिक वाचा.सांगली : राजारामबापू साखर कारखाना एफआरपीमध्ये खोडा घालत असतो
23 ऑक्टोबर

राजारामबापू साखर कारखाना : सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने 1रकमी FRP देण्यासाठी तयार आहेत. मात्र, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील हेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एकरकमी FRP देवू देत नाहीत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे यांनी येथील पत्रकार बैठकीत केला. वाचा सविस्तर


‘मण्यार’ चा दंश: भावापाठोपाठ बहिणीचाही मृत्यू
20 ऑक्टोबर
आळसंद (सांगली)  येथल्या भाळवणी मार्गावर राहत असलेल्या सुनील कदम यांच्या राहत्या घरी मण्यार जातीच्या सर्पाने दंश केल्याने सख्ख्या भावानंतर लगेचच त्याची बहीण सायली वृषभ जाधव (Sayli Jadhav) (वय २४) यांचा सांगलीच्या (Sangli todays News) वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायलीच्या मृत्यूने परिसर शोकसागरात बुडाला आहे. वाचा काय आहे नेमकं प्रकरणसांगलीत अखेर कॉलेज चालू
20 ऑक्टोबर
मागील दीड वर्षापासून बंद असलेले उच्च शिक्षणाचे म्हणजेच कॉलेजची सुरवात आज पासून झाली. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावत पहिल्या दिवशी उत्साह दाखवला. प्राध्यापकांनी तातडीने पुस्तके उघडून अद्यापनाचा श्री गणेशा केला. काही वर्गांची प्रवेश प्रक्रिया अर्धवट आहे. (College News Story) ती आजपासून सुरु करण्यात आली.

सांगली: जत तालुक्यातील बागलवाडीमध्ये ८० हजार रुपयांच्या डाळिंबांची चोरी
दिनांक:13 ऑक्टोबर
बागलवाडी येथील शेतकरी असलेल्या राजेंद्र कदम यांच्या डाळिंब बागेमधून अज्ञात चोरट्यांनी  800 किलो डाळींब चोरून नेल्याची घटना घडली असून हे चोरीस गेलेले डाळिंब परिपक्व व निवडक आहेत. आताच्या बाजारभावानुसार या डाळिंबाची किंमत ७० ते ८० हजार रुपये असून मंगळवारी दिनांक. (Jath News Update) १२ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर डाळींब चोरीला गेल्याचे राजेंद्र कदम यांच्या निदर्शनास आले. तर ही घटना सोमवारी रात्री घडली असल्याची संशय कदम यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर

पोलिसात तक्रार दिल्याने मुलाकडून वडिलांचा खून
दिनांक :13 ऑक्टोबर
मार-हाणीबाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केल्यामुळे रागातून मुलाने वडिल किसन जोतीराम माने (वय 55) यांच्या डोक्यामध्ये पहार घालून निर्घृण खू- न केल्यानंतर  संशयित मुलगा विजय किसन माने (30, रा. माधवनगर बायपास रस्ता, मिरज) हा फरारी झाला आहे. वाचा सविस्तर

सांगलीमध्ये महिलेचा गळा दाबून खू-न, मानलेल्या पतीस अटक

दिनांक: 13 ऑक्टोबर

सांगलीतील गोकुळनगर येथे काली उर्फ काजल मोहन गुदररावत हिचा गळा आवळून खू-न करण्यात आला.(Sangli Batmi) या प्रकरणी संबंधित महिलेचा मानलेला पती जुबेद अब्दुलवाहिद सवार (वय 30, रा. सध्या खानभाग )या संशयितास अटक करण्यात आलेली आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.पूरग्रस्तांच्या मदतीवरून पुन्हा राडा; महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
दिनांक 12 ऑक्टोबर
महाराष्ट्र राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रतिगुंठा १३५ रुपयाची मदत जाहीर केली आहे.मात्र ही मदत खूपच कमी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून पक्ष्यांच्या वतीने मंगळवारी सांगलीमध्ये(Sangli Swabhimani sanghatana News) महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सविस्तर बातमी वाचा येथे क्लिक करून.

जतमधील कोणीकोनूरमध्ये माजी सैनिकांने केला हवेत गोळीबार
दिनांक: 9/ ऑक्टोबर
कोणीकोनूर ( ता. जत ) येथील एका माजी सैनिकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली असून या माजी सैनिकाचे नाव  गंगाराम जयराम लमाण (चव्हाण) वय. ३९ असे  आहे. याची नोंद उमदी पोलिसात झाली आहे. तर लमाण यास पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना जामीन मिळाला आहे. वाचा सविस्तर येथे क्लिक करून

सांगली हादरली! 5 वर्षांपूर्वी दोस्तीमध्ये आलं वैर; डोक्यात दगडी पाटा घालूनच मैत्रीचा शेवट
दिनांक 10/ ऑक्टोबर

सांगलीतल्या मिरज तालुक्यामधील हरिपूर गावात एका तरुणाचा डोक्यामध्ये दगडी पाटा घालून निर्घृण हत्या (Brutal murder in sangli) केल्याची घटना उघडकीस आली असून मृत तरुण हा मागील मारहाणीबाबतचा खटला मागे घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेला होता. 
मात्र तेथे झालेल्या वादावादीत फिर्यादी तरुणानं डोक्यामध्ये दगडी पाटा घालून तरुणाची हत्या (Crashed head with stone) केली आहे. याबद्दल सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुख्य आरोपी तरुण, त्याच्या आई आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल संपुर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


अश्याच महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी 

स्थायी समितीचे सदस्य पांडुरंग कोरे यांनी दिला राजीनामा
दिनांक 8/ऑक्टोबर
सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे भाजपचे स्थायी समिती सदस्य पांडुरंग कोरे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा आयुक्तांकडे सोपवला. आता त्यांच्या जागेवर  भाजपकडून नवीन सदस्याला संधी देण्यात येणार आहे.  गतवर्षीच स्थायी समितीवर निवड त्यांची झाली होती. त्यानंतर त्यांना सभापती पद दिले होते. त्यांनी एक वर्ष पूर्ण झाल्यावर सदस्यत्वाचा राजीनामा दिले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


⚡⚡जाहिरात : 
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर. 

दिनांक 8/Oct
मैत्रिणीस प्रपोज केल्यावर तिने नकार (female friend refused to love affair) दिल्याने सांगलीमधल्या तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केला. संबंधित तरुण आत्महत्या करण्यासाठी टेरेसवर गेला (Went to terrace to commit suicide) आणि याठिकाणी त्या मुलीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करण्याची धमकी (Suicide threat on video call) देत होता. त्यावेळी तो इमारतीच्या संरक्षक भिंतीवर देखील चढला. मात्र गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे संबंधित तरुणाचे प्राण वाचले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा."सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आलीय", गोपीचंद पडळकरांनी केली जयंत पाटलांवर टीका
दिनांक 8/oct
महाविकास आघाडी आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. (Gopichand Padalkar News Update) जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले याची अद्याप ही माहिती सांगली जिल्हा नियोजन समिती मार्फत दिली गेली नाही. तसेच बैठकीत एका आमदाराला एक, एका आमदाराला एक न्याय का असे विचारले असता. तर आम्ही बघतो पाहतो असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री जयंत पाटील यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकीनंतर केली. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


दिनांक 8/oct

सांगलीतील विश्रामबाग चौकात सकाळी 11 च्या सुमारास वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी ईरवंत यमलवाड यांना राजस्थान मधील परप्रांतीय कामगार उपमाराम जागडा याने मारहाण केली. (Sangli RTO)

याबद्दल जागडा याच्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करत  अटक करण्यात आली आहे. याविषयी वाहतूक पोलिस कर्मचारी ईरवंत यमलवाड यांनी फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads