Amazon

Ads Area

header ads
header ads

युवराज सिंगनंतर युविका चौधरीला झाली एकाच कारणास्तव अटक, पहा कारण | Yuvika Chaudhary Arrested

बॉलिवूड अभिनेत्री व बिग बॉसमध्ये याआधी काम केलेल्या युविका चौधरीने सोमवारी हांसी (हिसार, हरियाणा) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तेथे हरियाणा पोलिसांनी तिला औपचारिकरितीने अटक केली( yuvika chaudhary arrest ) असून डीएसपी कार्यालय हांसीमध्ये तिची चौकशी केली गेली.
डीएसपी विनोद शंकर यांनी यावेळी माहिती दिली, सुमारे 3 तास yuvika  Chaudhary ची चौकशी झाल्यानंतर  हरियाणा पोलिसांनी जामिनावर तिची सुटका केली. यावेळी  युविका चौधरी सोबत सुमारे 10 बाऊन्सर, तिचा पती प्रिन्स नरुला आणि त्यांचे वकील देखील उपस्थित होते. 

why yuvika chaudhary arrested? युविका चौधरीला अटक का झाली?

25 मे रोजी युविका चौधरीने तिच्या ब्लॉगवर एका व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती समाजासाठी ( casteist slur ) अपमानजनक टिप्पणी केली होती.  यामुळे अनुसूचित जाती हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी अभिनेत्री युविका विरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत पोलीसामध्ये हांसी येथे गुन्हा दाखल केला होता. 

तक्रार दाखल केलेल्या रजत कलसन यांनी सांगितले की, या अभिनेत्रीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात तिच्याविरुद्ध दाखल झालेला खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयाने तिला कोणताही दिलासा दिला नाही.

त्यानंतर अभिनेत्री युविकाने हिसार येथे असलेल्या अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती, मात्र 11 ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. (yuvika chaudhary castiest slur) तर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने युविकाला दिलासा देत, तिचा जामीन मंजूर केला आणि तिला तपासासाठी सामील होण्याचे आदेश दिले.

पोलीस युविका चौधरीच्या विरोधात हिसारच्या विशेष न्यायालयात कागदपत्रे सादर करतील त्यावेळी तिला पुन्हा जामीन मिळवावा लागेल. जर युविका चौधरीवरचे आरोप  सिद्ध झाले तर न्यायालय तिला 5 वर्षांची शिक्षा देऊ शकते.

आपल्याला सांगू इच्छितो की, युविका विरोधात तक्रार दिलेल्या तक्रारदार रजत कलसन यांनी भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधासुद्धा एससी एसटी कायद्यान्वये गुन्हाही नोंदवला होता, ज्यामुळे युवराज सिंगला 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ( yuvraj singh arrested ) कलसन यांनी यावेळी माहिती दिली की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही वरील मालिकेमधील बबिता हिची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्यावर सुद्धा हांसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  तिला अजून अटक झाली नाही.  

इंटरनेटवर युजर्स what did yuvika chaudhary say? सर्च करत असून त्याबद्दल माहिती घेत आहेत.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads