Amazon

Ads Area

header ads
header ads

Aryan Khan सोबत चॅटिंग म्हणून अनन्या पांडे ची चौकशी !पण ती आरोपी नाही.NCB अधिकार्‍याचे मत

 

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ‌हिला आर्यन खान ड्रग्स प्रकरणात  २२ ऑक्टोबर रोजी  NCB कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. अनन्याला गुरुवारी २१ ऑक्टोबर रोजी एनसीबीतर्फे समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर अनन्याने दुपारी ४ वाजता एनसीबी कार्यलयात हजर होती. सलग दोन तास तिचे चौकशी सुरू होती. आर्यन खान याच्या मोबाईलमधील चॅटिंग मध्ये तिचे नाव होते म्हणून तिला तिला चौकशीसाठी थांबवून घेतलं होतं.


 गुरुवारी काही एनसीबी अधिकारी चंकी पांडे यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी अनन्याला समंजसपणे बजावले होते. त्यानुसार अनन्या वडील चंकी यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात हजर झाली होती. ४ वाजता कार्यालयात आलेल्या अनन्याची चौकशी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केली. चौकशीच्या वेळेस त्यांच्यासोबत एक महिला अधिकारी उपस्थित होत्या. दोन तास चौकशी केल्यानंतर अनन्याला सोडून देण्यात आलं. कायद्यानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही महिलेची चौकशी करू शकत नसल्याने तिला शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. यावेळेस अनन्याचे लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

अनन्या ची फक्त चौकशी करण्यात आली ती आरोपी नाही.

अनन्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आर्यनच्या चॅटमध्ये अनन्याचं नाव आल्याने तिला चौकशीसाठी बोलावलं होतं . अनन्या आरोपी नसल्याचं NCB अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. गुरुवारी झालेल्या चौकशीत अनन्याला आर्यनसोबतची मैत्री, अरबाज मर्चंट सोबतची मैत्री आणि पार्टीमध्ये घेतले जाणारे अमली पदार्थ, व्हाट्सअप चॅट यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. 

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads