Amazon

Ads Area

header ads
header ads

तब्बल 18 दिवसानंतर शाहरुख भेटला आर्यनला तेही फक्त 18 मिनिटे! दोघेही रडत होते. पण नक्की असे काय बोलणे झाले?

 आलिशान आयुष्य जगणाऱ्या आर्यनल खानाला क्रुझवरील सफारी चांगलीच महागात पडली आहे. यानिमित्ताने कायद्यापुढे सर्वजण समान असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आर्यनला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. इतके दिवस करोना प्रतिबंधक नियमांमुळे कारागृहात जाऊन भेटण्याची परवानगी नव्हती, परंतु आता ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेता शाहरुख खानने गुरुवारी आर्यनची भेट घेतली. 

 शाहरूख जेव्हा आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहामध्ये गेला तेव्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारावर आधार कार्ड दाखवत स्वतःची ओळख करून द्यावी लागली. त्यानंतर लाईनमध्ये उभे राहून टोकन घ्यावे लागले आणि त्यानंतर जेव्हा त्याचा नंबर आला तेव्हा त्याला आतमध्ये सोडण्यात आले. आतमध्ये गेल्यानंतर आर्यनला भेटण्यासाठी १८ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता, जेव्हा आर्यन समोर आला तेव्हा बाप-लेकांच्या डोळ्यात अश्रू आले. शाहरुख खान कोठडीत येण्याची खबर मिळाल्याने सर्व मिडिया रिपोर्टर्स तेथे हजर होते पण त्यांना काहीही दाद न देता शाहरुख डायरेक्ट कारागृहात पोहोचला. इतर कैद्यांसाठी जो नियम आहे .तो ही आर्यन खान साठी असल्याने शाहरुख खान तुरुंग अधिकाऱ्यांना स्वतःचा आधार कार्ड दाखवून ओळख पटवून दिली. त्यानंतर आर्यन ला भेटण्यासाठी तो निघाला. 


आर्यनला पाहून शाहरुख खानला रडू आवरले नाही ते दोघेही भावूक होऊन रडू लागले. आर्यनला तुरुंगातील जेवण आवडत नसल्याचे त्याने शाहरुखला सांगितले होते तर शाहरुख ने घरचे जेवण देण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती केली होती. पण ते काही शक्य नव्हते कारण आर्यनला सुद्धा इतर कैद्यांनी प्रमाणे तेच नियम लागू होतात. २० मिनिटे शाहरुखला बोलण्यासाठी  वेळ दिली होती शाहरुख तेथून 18 व्या मिनिटाला बाहेर पडला. त्या दोघांच्या मध्ये काय बोलणे सालेम हे सांगता येत नाही. पण शाहरुख तेथून बाहेर निघताना अधिकाऱ्यांचे आभार मानले. तो बाहेर आला. रिपोर्टर्स त्याच्या मागे धावत होते. पण तो हात सोडून आपल्या गाडीच्या दिशेने वळला.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads