Amazon

Ads Area

header ads
header ads

'तुझी-माझी रेशीमगाठ' या मालिकेमधील शेफालीचं Mumbai Indians शी काय आहे खास कनेक्शन......

 झी मराठीवरील नुकतीच सुरु झालेली मालिका,' तुझीमाझी रेशीमगाठ 'यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. वेगवेगळे कलाकार आणि उत्कृष्ट छायाचित्रण त्याचप्रमाणे बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसणारी परी यामुळे मालिका प्रेक्षकांच्या मनात भरली आहे. पण काही कारणांमुळे मालिकेला ट्रोल करण्यात येत आहे.छोट्या पडद्यावरील ही मालिका खूप गाजतेय. त्यामधील श्रेयस- प्रार्थना ची जोडी आणि परी यांची घराघरात चर्चा होते त्याच बरोबर अनेक अनुभवी कलाकार यांचा समावेश असल्यामुळे  मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. त्यातीलच एक कलाकार म्हणजे शेफाली.

नेहा ची सहकारी आणि जवळची मैत्रीण ही भूमिका साकारत अभिनेत्री काजल काटे भूमिका बजावते.

या व्यक्तिरेखेबद्दल बद्दल मत जाणून घेऊ," शेफाली माझ्यासारखीच आहे आनंदी मन मोकळे त्याचप्रमाणे सगळ्यांना हसवत असणारी ,काहीशी अल्लड मी सुद्धा अशीच आहे, त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळचे आहे. शेफाली म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर आल्या त्या कभी खुशी कभी गम या चित्रपटातील काजोल आणि जब वी मेट मधील करीना या दोघींचे मिश्रण म्हणजे शेफाली आहे."

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादा बद्दल तिनं सांगितलं, शेफाली ही व्यक्तिरेखा तिच्यासाठी आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले आहे लोक अजून जास्त मला ओळखायला लागले आहेत.

सोशल मीडियाद्वारे प्रेक्षक आवर्जून प्रतिक्रिया कळवतात आमच्या आयुष्यातही शेफाली सारखी एक तरी मैत्रीण असावी अशी प्रतिक्रिया मिळते तेव्हा मला आनंद गगनात मावेनासा होतो.मुंबई इंडियन्स शी  काय आहे खास कनेक्शन.....

आयपीएल मधील सर्वात उत्तम टीम म्हणजे मुंबई इंडियन्स.... या संघाच्या टीम मध्ये प्रतिक कदम प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत .प्रतीक काजलचा पती असून तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर सामन्या दरम्यान चे अनेक फोटो शेअर केले आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads