Amazon

Ads Area

header ads
header ads

नीरज चोप्राने घडवला इतिहास; भारताला ऑलम्पिकमध्ये मिळालं पहिलं गोल्ड मेडल - Neeraj Chopra Gold Medal

 टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक मध्ये भारताला यावेळच पहिलं गोल्ड मेडल मिळालं असून भालाफेकपटू निरज चोप्राने भारताला हे गोल्ड मेडल मिळवून दिलं.


नीरज चोप्राने 87.58 मीटर लांब भाला फेक करत सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले. या ऑलिम्पिकमध्ये भारताने गोल्ड मेडल जिंकत शेवट गोड केला.

भारताच्या झोळीमध्ये एकूण सात पदकं

टोकियोतल्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलं. त्यानंतर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकलं. बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर नाव पटकावलं. रवी दहियाने कुस्ती मध्ये रौप्य पदक जिंकून दिलं. भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं. तर नीरज चोप्राने भालाफेक मध्ये सुवर्ण पदक आणि बजरंग पुनियाने कुस्तीत कांस्य पदक जिंकून दिलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीरज चोप्राच्या यशावर काय म्हणाले?
(PM Narendra Modi On Niraj Chopra) 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे ट्विटर वरून कौतुक केले. यात त्यांनी नीरज चोप्राने इतिहास घडवला. नीरजने जे साध्य केले ते कायम स्मरणात राहिल. सुवर्ण जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन, असं ट्विट केलं.

2012 चा विक्रम मोडीत 
लंडन ऑलिम्पिकमधल्या पदकांचा विक्रम मोडीत काढत यावेळी 7 पदकांची कमाई भारताने केली आहे.  2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत 6 पदकं जिंकली होती. 
आता 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका गोल्ड मेडलसोबत एकूण सात पदकं जिंकत, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

नीरज चोप्राने मेडल केले मिल्खा सिंग यांना समर्पित

भालाफेकपटू नीरज चोप्राने 'फ्लाइंग सिख' म्हणून ओळखले जाणारे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना आपले गोल्ड मेडल समर्पित केले. 'मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. कदाचित ते मला स्वर्गातून बघत असतील. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती', असं तो यावेळी म्हणाला. मिल्खा सिंग हे धावपटू होते.

गोल्ड मेडल मिळाल्यावर अभिनव बिंद्रा भावुक

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर अभिनव बिंद्राने नीरजचं कौतुक केलं आहे. त्याने ट्विटरवर भावनिक पत्र शेअर करत नीरजचं अभिनंदन केलं.
नीरज चोप्राने सुवर्ण जिंकलं. तुला सलाम. तू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलं आहेस, धन्यवाद! आणि या क्लबमध्ये स्वागत  आहे. याची खरंच आवश्यकता होती. खूप अभिमान वाटत आहे. तुझ्यासाठी खूप आनंद होत आहे. असं अभिनव बिंद्राने पत्रात लिहिलं आहे. अभिनव बिंद्रा हा 2008 च्या बीजिंग ऑलम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकला होता.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads