Ind vs Eng पाचव्या दिवसाच्या खेळात पावसाच्या खेळ : पहिली कसोटी cricket Match अनिर्णित

भारत आणि इंग्लंड या संघामध्ये नॉटिंगहॅम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसाच्या खेळामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहिली.

● सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी ९८ षटकांमध्ये १५७ धावांची आवश्यकता होती. भारताच्या ९ विकेट शिल्लक होत्या. 

सकाळपासूनच नॉटिंगहॅममध्ये पाऊस सुरु होता. पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. पण चहापानानंतर पाऊस ओसरला नाही तो अधिक जोर धरला.

पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. 

दरम्यान, पहिल्या डावामध्ये अर्धशतक आणि दुसऱ्या डावामध्ये शतक ठोकणाऱ्या जो रुटला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 

 

🥏 *जीवन मराठी* चे अपडेट्स मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर तेही अगदी मोफत
http://bit.ly/Join_Jeevan_Marathi_Whatsapp_Updates
लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने