Amazon

Ads Area

header ads
header ads

क्रियापद (verb) शब्दांच्या जाती- मराठी व्याकरण Information in Marathi

आपण शब्दांच्या जाती या मराठी व्याकरणातील महत्वाच्या भागात आतापर्यंत नाम, सर्वनाम आणि विशेषण हे मुद्दे पाहिले आता या आर्टिकल मध्ये आपण Verb in Marathi म्हणजेच क्रियापद पाहुयात...

क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे क्रिया दर्शविली जाऊन त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो शब्द होय.

उदा. म्हैस दूध देते.


या वाक्यामध्ये देते या शब्दाने क्रिया दर्शवली गेली आहे. म्हणजेच वाक्यातील कर्ता करत असलेले कार्य दर्शवण्याचे काम क्रियापद करतो. 

या क्रियापदाचे 5 प्रकार पडतात.
1. सकर्मक क्रियापद, 2. अकर्मक क्रियापद,3. संयुक्त क्रियापद, 4. सहाय्यक क्रियापद, 5. प्रयोजक क्रियापद

या प्रकारात क्रियापदास अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते.
उदा. 'मी लिहितो' याऐवजी 'मी पुस्तक लिहितो' ही अधिक सार्थ ठरते.
लिहितो, वाचतो, पाहिले,...

2. अकर्मक क्रियापद
या प्रकारात क्रियापदास अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता लागत नाही.
उदा. आला, गेला, बसतो, उडणे, धावणे, 
'तो धावतो' हे वाक्य अर्थपूर्ण आहे. 


3. संयुक्त क्रियापद
या प्रकारात दोन अथवा अधिक क्रियापदे असतात. त्या पैकी एकाचे धातुसाधित रूप असते.
उदा. "तो लिहीत बसला." या वाक्यामध्ये लिहिणे आणि बसणे अशी दोन क्रियापदे आहेत तरीपण एकाच कृतीचा बोध होतो. म्हणून या वाक्यातील "लिहीत बसला" हे संयुक्त क्रियापद आहे. 
लिहिता, येत, जात, खाऊन, पिऊन, खेळत, पोहत,...

4. सहाय्यकारी क्रियापद
या प्रकारात संयुक्त क्रियापदानंतर येणारे क्रियापद असते.

उदा. "तो जात आहे." या वाक्यात आहे हे क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आहे.

5. प्रयोजक क्रियापद
या प्रकारात कोणीतरी दुसऱ्याडून एखादी क्रिया घडवून घेतो.

उदा. "शाम मुलास खेळवतो." या वाक्यात शाम कडून ही क्रिया घडवून घेतली म्हणजे खेळवतो हे प्रयोजक क्रियापद आहे.

पुढील मुद्दा-   5. क्रियाविशेषण अव्यय

शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads