Amazon

Ads Area

header ads
header ads

सर्वनाम (Pronoun) शब्दांच्या जाती - मराठी व्याकरण Information in Marathi

शब्दांच्या जातीचा अभ्यास करत असताना नामा नंतर चा मुद्दा सर्वनाम आहे. एखादा नाम सारखा वाक्यात येत असेल तर ते ऐकायला बरे वाटत नाही म्हणून हा नामाचा वारंवार येणारा शब्द टाळण्यासाठी नामाऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द वापरले जातात.
 वाक्यात येणाऱ्या सर्वनामला स्वतःचा अर्थ नसतो त्यांना नामाबद्दल चा अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यामध्ये जोपर्यंत नाम येत नाही तोपर्यंत सर्वनाम वापरता येत नाही. म्हणजेच हा एक प्रकारे नामाचा प्रतिनिधी आहे.


नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.

उदा. ’तो’ हा शब्द गणा, वाडा, कळप, थवा अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. ती हा शब्द सीता बद्दल वापरला जातो.
उदा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो कोण काय इ....

सर्वनामाचे 6 प्रकार पडतात.
पुरुषवाचक सर्वनाम,दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम
1. पुरुषवाचक सर्वनाम
बोलत असताना किंवा लिहीत असताना बोलणाऱ्याच्या किंवा लिहीणाऱ्याच्या दृष्टीतुन जगामधल्या सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात.

● बोलणाऱ्यांचा
● ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा
● ज्यांच्या विषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.
तर यांना व्याकरणामध्ये 'पुरुष' असे म्हणतात.

याचे तीन प्रकार आहेत.
प्रथम पुरुषवाचक - यात बोलणारा स्वतः बद्दल उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो
उदा. मी, आम्ही, आपण

द्वितीय पुरुषवाचक - ज्याच्यासोबत बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना ही सर्वनामे  वापरली जातात.
उदा. तू, तुम्ही, 

तृतीय पुरुष वाचक- ज्यांच्याबद्दल बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत असताना ही सर्वनामे वापरली जातात.
उदा. तो, ती, ते, त्या.

2. दर्शक सर्वनाम
दर्शक सर्वनाम म्हणजे ज्याद्वारे जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात.
उदा. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या.
वाक्य- तो डोंगर दूर आहे.

3.संबंधी सर्वनाम 
वाक्यात नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी (तो-ती-तें-ते-त्या) – जो, जी, जें, जे, ज्या. 

4.प्रश्नवाचक सर्वनाम
या सर्वनामांचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो.
उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, का, कसे....

5. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे म्हणजे ज्यावेळी वाक्यात कोण, काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही.
उदा. कोणी कोणास हसू नये.

6. आत्मवाचक सर्वनामे
आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो. उदा.

उदा. स्वतः, आपण
मी स्वतः त्याला पाहिले.
तो आपण होऊन माझ्याकडे आला.

पुढील मुद्दा-  3.विशेषण

⚡शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


🙏अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads