Amazon

Ads Area

header ads
header ads

विशेषण (Adjective) शब्दांच्या जाती- मराठी व्याकरण Information in Marathi

शब्दांच्या जाती या मराठी व्याकरणातील महत्त्वाच्या घटकाविषयी अभ्यास करत असताना आपण नाम आणि सर्वनाम याविषयी माहिती पाहिली आता आपण विकारी शब्द किंवा सव्यय शब्दतील तिसरा महत्वाचा मुद्दा विशेषण पाहणार आहोत.
विशेषण म्हणजे  नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्द होय.

उदा. चांगला, वाईट, बरा, भित्रा, शूर, काळा, केसरी....

या विशेषणाचे सुद्धा तीन प्रकार पडतात.
गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण
आता सविस्तर पाहुयात.


1. गुणवाचक विशेषण
नामाबद्दलचा कोणत्याही प्रकारचा गुण अथवा विशेष माहिती दर्शविणारा शब्द म्हणजे “गुणवाचक विशेषण” होय.

उदा. गरीब, श्रीमंत, भित्रा, धीट, शूर, हिरवा, शुभ्र, निळा

2. संख्या विशेषण
ज्या विशेषणांच्या उपयोग करून नामाची संख्या दाखविली जाते त्यास 'संख्या विशेषण' असे म्हणतात. 

या संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत. 
1. गणनावाचक संख्या विशेषण
2. क्रमवाचक संख्या विशेषण
3. आवृत्तीवाचक संख्या विशेषण
4. पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण
5. अनिश्चित संख्या विशेषण

1. गणना वाचक संख्या विशेषण 
याचा उपयोग वस्तूची गणना करण्यासाठी होतो.
उदा. एक, पाच, दहा, तेरा, पंधरा आणि पन्नास ही गणनावाचक विशेषणे आहेत. 
या विशेषणाचे सुद्धा तीन प्रकार पडतात
1. पूर्णाक वाचक – सात, नऊ, अकरा, सतरा.
2. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड,
3. साकल्य वाचक – पाच मैत्रिणी, दोन भाऊ, आठ मित्र, डझन, 

2. क्रमवाचक संख्या विशेषण
हे वाक्यातील विशेषण वस्तूचा क्रम दाखवते. 
उदा. पहिले दुकान, आठवा बंगला, सातवे वर्ष

3. आवृत्तिवाचक संख्या विशेषण 
हे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते.

उदा. चौपट मुले, तिप्पट रस्ता, दुहेरी रंग, दसपट, शंभरपट

४. पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण 
ही विशेषणे वेगळा बोध करून देतात.
उदा. प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा
मुलींनी पाच-पाच चा गट करा, 

५. अनिश्चित संख्या विशेषण 
या विशेषणाद्वारे नामांची निश्चित संख्या किंवा प्रमाण व्यक्त होत नाही 
उदा. पुष्कळ, थोडे, खूप, काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी

3. सार्वनामिक विशेषण :
हे विशेषण सर्वनामांपासून बनलेले असतात.
उदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी, ती कोकिळा, ते मूल, 

पुढील मुद्दा-  4.क्रियापद

शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या